{"product_id":"30-women-in-power-their-voices-their-stories-2","title":"30 Women in Power [MARATHI]","description":"\u003cp\u003e३० विमेन इन पॉवर हे श्री-सामर्थ्याचा निर्धारपूर्वक सत्कार करणारं अद्वितीय असं पुस्तक आहे. हे करत असताना काही दुर्मीळ गोष्टी या पुस्तकानं साध्य केल्या आहेत- सर्वोच अधिकारपद भूषवणाऱ्या खियांचं व्यामिश्र आणि सगळ्या छटा टिपणारं चित्र त्यानं समोर आणलं आहे; त्यांचा नाजूकपणा आणि सामर्थ्य, त्यांचं अपयश आणि कर्तृत्व त्यानं स्पष्ट केलं आहे. यशस्वी पुरुषांप्रमाणेच; पण अधिक दिमाखदारपणे स्त्रियांचे कष्ट आणि त्यांची भावनिक बुद्धिमत्ता या पुस्तकानं अधोरेखित केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- आदित्य पुरी, मॅनेजिंग डायरेक्टर, एचडीएफसी बैंक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्यावर मात करणं अवघड वाटावं अशा प्रतिकूलता असतानाही भारतीय खिया उत्तुंग यश मिळवू शकतात, याची आठवण करून देणारं ३० विमेन इन पॉवर हे पुस्तक प्रामाणिक, धाडसी आणि ब्रष्ट्या खियांच्या कथा मांडतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअझीम प्रेमजी, चेअरमन, विप्रो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'३० सामर्थ्यशाली स्त्रिया' हे भारतातल्या बँकिंग, कायदा, माध्यमे, जाहिरातक्षेत्र, शासकीय सेवा, आरोग्यसेवा, सल्लाक्षेत्र, वेगाने खपणाऱ्या व दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे क्षेत्र आणि स्वयंसेवी क्षेत्र अशा अनेकविध क्षेत्रांतल्या ३० सामर्थ्यशाली स्त्रियांचे अनुभवकथन आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या समर्थ स्त्रियांनी आपल्या यशाविषयी आणि भविष्यातील आपल्या स्वप्नांविषयी मोकळेपणाने चर्चा केली आहे. कष्टसाध्य यशाच्या मागे असलेल्या मानसिक किंवा इतर अडथळ्यांचा, अपयशांचा उल्लेखही त्यांनी केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्य यांची जास्तीत जास्त चांगली सांगड कशी घालावी, इथपासून ते लिंगभावविषयक पूर्वग्रह कसे दूर करावेत, असे जे प्रश्न आजच्या नोकरी - व्यवसाय करणाऱ्या सर्वच स्त्रियांना पडतात, त्यांची उत्तरेही आपल्या चिंतनशील कथनांतून या स्त्रियांनी दिली आहेत. व्यावसायिक क्षेत्रातल्या असा'गन्य अग्रणी नैना लाल किडवाई यांनी संपादित केलेले हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आहे.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Clapping Pages","offers":[{"title":"Used","offer_id":45217087619258,"sku":"31F9989VL-Used","price":15.0,"currency_code":"AED","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0713\/5576\/0826\/files\/vf_df6cf5db-d572-49ff-b059-760fc0d5eafc.jpg?v=1759943547","url":"https:\/\/clappingpages.com\/products\/30-women-in-power-their-voices-their-stories-2","provider":"Clapping Pages","version":"1.0","type":"link"}