{"product_id":"the-tcs-story-marathi-edition","title":"The Tcs Story [Marathi Edition","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eराम हा घट्ट विणीच्या टीमचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. याच टीमने टीसीएसला अवघ्या विश्वाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवले. आयटी सेवाक्षेत्रात टीसीएस आंतरराष्ट्रीय नकाशावर नेली. कंपनीच्या या परिवर्तनाचा प्रवास कथन करणाऱ्या या पुस्तकाचे वाचन मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे. रतन टाटा (चेअरमन, टाटा सन्स) एका निवृत्त एक्झिक्यूटिव्हने स्वतःची आरती ओवाळून घेण्यासाठी हे चरित्र आणि निवडक स्मरणचित्रे शब्दबद्ध केलेली नाहीत. तर एखादी कंपनी 'टॉप'वर जाताना एका टीमने केलेले अविश्रांत परिश्रम, त्यांचे यश आणि अपयश सांगणारी ही अतिशय रोमांचक कहाणी आहे. कंपनीने यशोशिखर कसे गाठले, त्याचा एका सीईओने सादर केलेला हा चोख दस्तावेज आहे. - क्लेटन ख्रिस्टेन्सन (प्रोफेसर, हार्वर्ड बिझिनेस स्कूल) 'ग्रेट कंपनी' कशी निर्माण करायची याचा अभ्यास करायचा असेल, तर हे पुस्तक वाचा! नेतृत्व कसे असावे, टीमवर्क कसे असावे आणि यातूनच 'टॉप' स्थान कसे मिळते हे रामने या पुस्तकात अधोरेखित केले आहे. त्याची वैयक्तिक आव्हाने, यश याविषयी वाचल्यानंतर वाटते, चांगल्या लोकांना नेहमी चांगलेच मिळते. - डेव्हे कल्हॉन (चिफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, नेल्सन) आपलं आयुष्य घडवताना किंवा वेगानं बदलणाऱ्या समाजात आणि औद्योगिक जगतात जागतिक स्तरावरचा एखादा नवा उद्योग उभा करताना कोणती आव्हानं समोर उभी राहतात, याचे अत्यंत रोचक अनुभव सुब्रह्मण्यम रामदोराई यांनी आपल्या जीवनप्रवासाच्या कहाणीत सांगितले आहेत. आज जो एक नवा भारत आपल्याला दिसतोय तो घडण्याच्या काळातला एक महत्त्वाचा घटक या नात्यानं त्या प्रक्रियेचा फायदा घेत त्यांनी स्वतःला उद्योगजगतातला एक प्रेरणादायी नेता बनवलं. हे पुस्तक वाचा म्हणजे तुम्हांलाही प्रेरणा मिळेल. जोसेफ अॅकरमान (अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ आणि कार्यकारी समिती) काही विशिष्ट कंपन्यांनी सगळ्या जगाला आश्चर्य वाटेल अशा स्वरूपाचं केलेलं काम, त्यांच्या नेतृत्वाची दूरदृष्टी आणि निर्धार यामुळेच आयटी आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारताचा ठसा उमटला आहे. टीसीएस आणि रामदोराई यांचा यात फार मोठा वाटा आहे. टीसीएसने सिंगापूरमध्ये केलेल्या प्रगतीच्या मागे हाच प्रेरणास्त्रोत होता आणि त्याच जोरावर टीसीएसने एशिया-पॅसिफिक भागात कंपनीच्या विस्ताराचं नियोजन केलं आहे. त्यांच्या बरोबरचं प्रत्येक संभाषण क्षमता आणि गुणवत्ता या दोन मुद्यांवर येऊन थांबत असे. या दोन्ही गोष्टींवर त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि आपल्या देशाप्रमाणेच आपल्या कंपन्यांच्या यशासाठीही याच दोन गोष्टी आवश्यक आहेत, असं त्यांचं ठाम मत होतं.\u003c\/span\u003e","brand":"Clapping Pages","offers":[{"title":"Used","offer_id":45190011125946,"sku":"2VH5KWVSX-Used","price":15.0,"currency_code":"AED","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0713\/5576\/0826\/files\/71aJLblx1QL._SY385.jpg?v=1758995104","url":"https:\/\/clappingpages.com\/products\/the-tcs-story-marathi-edition","provider":"Clapping Pages","version":"1.0","type":"link"}